एक्स्प्लोर
Tukaram Mundhe | नागपूरातील भाजपचे नगरसेवक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेटीला | ABP Majha
नागपूरच्या आयुक्तपदी विराजमान होऊन तुकाराम मुंढेंना अजून महिनाही लोटला नाही तोच भाजप नगरसेवकांनी त्यांच्याविरोधात तक्रारीचा सूर आळवायला सुरुवात केलीय... मंजूर विकास कामांना स्थगिती दिल्याचा ठपका ठेवत भाजप नगरसेवकांनी तुकाराम मुंढेंविरोधात नाराजी व्यक्त केलीय.... आज एकाचवेळी भाजपच्या 109 नगरसेवक तुकाराम मुंढेंच्या भेटीला पोहोचले. तुकाराम मुंढेंनी त्यांना भेटण्यासाठी 15 मिनीटं अवधी दिला. किमान एक तास वेळ देणं अपेक्षित असताना आयुक्तांनी एवढा कमी वेळ का दिला, नगरसेवकांना बसण्यासाठी खुर्च्या का नाही.. अशा अनेक तक्रारींचा पाढा नगरसेवकांनी वाचलाय..
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















