एक्स्प्लोर
Nagpur G 20 : नागपुरात जी-20 बैठका, देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार
जी 20 परिषदेच्या सिव्हिल ट्वेंटी या उपसमितीची दोन दिवसीय बैठक आजपासून नागपुरात सुरू होतेय. आज सकाळी 9 वाजता बैठकीला सुरुवात होणार असून सकाळच्या सत्रात विकास आणि पर्यावरणीय समतोल या विषयावर चर्चा होणार आहे. दुपारी 3 वाजता सिव्हिल ट्वेंटी बैठकीचं औपचारिक उद्घाटन होणार असून त्यामध्ये आध्यात्मिक गुरू माता अमृतानंदमयी अध्यक्ष असणार आहे. उद्घाटन सोहळ्यात नोबल शांतता पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. आजचं कामकाज संपल्यावर सर्व परदेशी पाहुणे संध्याकाळी फुटाळा तलावातील लेझर शो पाहायला जाण्याची शक्यता आहे..
आणखी पाहा























