Coal Mine In Nagpur city : नागपूर शहरालगत सुरू करणार कोळशाची खाण
एखाद्या मोठ्या शहरालगत केंद्र सरकार कोळशाची खाण सुरू करण्याचा विचार करतंय, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरंच घडणार आहे नागपूर शहरात. नागपूर शहराला लागूनच असलेल्या गोंडखैरी कोळसा खाणीचा पट्टा हा अदानी समूहाला देण्यात आला असून येथे भूमिगत कोळसा खाण सुरु करण्याचा विचार केंद्र सरकार करतंय. तशी प्रक्रिया देखील केंद्रानं सुरू केली आहे. गोंडखैरी, वडधामना या नव्याने विकसित होत असलेला निमशहरी भाग आहे. सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीच्या नागपूर मेट्रो परिसरामधील 22 खेडी या कोळसा खाणीने प्रत्येक्ष बाधित होत आहते, तर आजूबाजूची 83 खेडी अप्रत्यक्षरीत्या बाधित होत आहेत. या भागातून मुंबई ते कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग जातो, नागपूरचा अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरही याने प्रभावित होणार आहे ... त्यामुळे गोंडखैरी कोळसा खाणीला घेऊन स्थानिकांचा विरोध सुरु झाला आहे..
![Nagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/f27e82e6826aab27db1ef8f60ad8c9351737545803361718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/10/e2965d114baffa27954690b036219aca173653368794490_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/05/fb03f806e96b95d816e1a6f06cd5a91e1736068265471718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Surendra Jain on Hindu vs Muslim : मुस्लिमांनी Kashi and Mathura वरचा दावा सोडावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/29/a9a6843359cfa18b632a8c0a11f75208173544937768990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/20/906870547a3997361c06f44df8b02a541734718269714718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)