(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Worli Hit And Run | वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणी आरोपी मिहीर शहाला वडिलांचा पळून जाण्याचा सल्ला
Worli Hit And Run : मुंबई : पुणे पोर्शे अपघातानंतर (Pune Porsche Accident) वरळी हिट अँड रन (Worli Hit And Run Case) प्रकरणानं संपूर्ण देश हादरला. पुण्यातील लाडोबानंतर शिवसेना उपनेत्याच्या मुलानं वरळीत आपल्या महागड्या कारनं एका महिलेला चिरडलं. तेव्हापासूनच मुख्य आरोपी फरार आहे. तर, काल (सोमवारी) आरोपीचे वडील राजेश शाह यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी राजेश शाह (Rajesh Shah) यांना कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाबाबत अनेक धक्कादायक दावे कोर्टात केल्याचं समोर आलं.
वरळी हिट अँड रन प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) याला वाचवण्यासाठी अपघातावेळी त्याच्यासोबत असलेल्या ड्रायव्हरवर सर्व दोष टाकण्याची योजना मिहीरच्या वडिलांनी आखली होती. अपघातानंतर राजेश शाहनं मुलगा मिहीरला ड्रायव्हरसोबत लोकेशन बदलण्यास सांगितलं आणि त्यासाठी दोघांचे अनेक वेळा कॉलवर बोलणंही झालं.