Mumbai Potholes : यंदा पावसाळ्यात मुंबई खड्ड्यात राहणार?, नव्याने बनवण्याचे काम सुरु
मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.. पावसाळ्यात मुंबई खड्डेमुक्त राहावी यासाठी मुंबई महापालिका कामाला लागली आहे.. मुंबईत रस्तेम दुरुस्तीची एकूण २४२ कोटींची कामं सुरू आहेत.. पालिकेच्या 24 वॉर्डसाठी प्रत्येकी 50 लाख, पूर्व द्रुतगती मार्गासाठी 90 कोटी तर पश्चिम द्रुतगती मार्गासाठी 140 कोटी रुपये खर्च करण्यात येतायेत. महत्त्वाचं म्हणजे खड्डे बुजवल्यावरही काही दिवसांनी रस्ता पुन्हा खराब होतो. हे लक्षात घेता जिथं आता खड्डे पडले आहेत, तो संपूर्ण पट्टा खोदून तिथं नव्य़ानं रस्ता करण्यात येतोय. तसंच, यंदा भर पावसातही खड्डे बुजवता येणार आहेत. कारण रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणं अवघ्या सहा तासांत पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करता येणारे 'रॅपीड हार्डनिंग काँक्रिट' तंत्रज्ञान वापरण्याचे निर्देशही कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.