Uddhav Thackeray Shivsena Assembly Elections : मुंबईतील 25 जागांसाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही
Uddhav Thackeray Shivsena Assembly Elections : मुंबईतील 25 जागांसाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही
लोकसभेत मोठं यश मिळवल्यानंतर आता ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकींसाठी कंबर कसलीये..ठाकरेंनी राज्यभरातील जागांची चाचपणी करण्यास सुरुवात केलीये.. विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय.. मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी ठाकरे गट आग्रही राहणार असल्याचं समजतयं.. वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.