(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray Dasara Melava 2024 : शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईतल्या शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या दसरा मेळाव्याची लगबग वाढलीय.. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालीय... विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय..
Dasara Melava 2024: शिंदे, ठाकरे, मुंडे, जरांगे..., आज 4 दसरा मेळावे; 'आव्वाज' कोणाचा घुमणार?; राज्याचं लागलं लक्ष
मुंबई: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून आज एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde), उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) या दोन पक्षांच्या दसरा मेळाव्यासह बीडमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde)-धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचे स्वतंत्र मेळावे होणार आहे. त्यामुळे आज दसरा मेळाव्यांमध्ये (Dasara Melava 2024) आवाज कोणाचा घुमणार?, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
ठाकरे गटाचे दसरा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सायंकाळी 5 वाजता, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर सायंकाळी 5 वाजता होणार आहे. ठाकरे गटाकडून दीड ते दोन लाख लोक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली असून शिंदे गटाकडून एक ते दीड लाख लोक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आज गर्दीचा उच्चांक कोण मोडणार, याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्या आहे.