Thane : ठाण्यात शिवसेना - राष्ट्रवादी आमनेसामने, खारेगाव उड्डाणपुलावरून श्रेयवाद रंगला
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी हातात हात घालून कारभार करत असले तरी ठाण्यात या दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढताना दिसतोय. आधी लसीकरणावरून झालेल्या आरोप प्रत्यारोपा नंतर आता खारेगाव उड्डाणपुलावरून हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर दंड थोपटून उभे राहिले आहेत. या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षातील नेते घेत आहेत. काल खासदार श्रीकांत शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी या उड्डाणपुलाच्या पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केल्या नंतर आज अचानक गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना घेऊन या पुलावर धडक मारली. खारेगाव पुलाचे काम आपल्या पाठपुराव्यामुळे झाले असे आव्हाड यांनी म्हटलंय






















