Abhijeet Dipke Jantar Mantar Protest: आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
Abhijeet Dipke Jantar Mantar Protest: दिल्लीत आज संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. आज जंतरमंतरच्या परिसरातील चारही रस्ते गर्दीने भरुन गेले आहेत.

Jantar Mantar Protest: नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरुन केंद्रीय शिक्षमंत्र्यांचा राजीनामा मागत दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर सुरु झालेल्या आंदोलनाचा आज 31 वा दिवस आहे. आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. हाच योग साधून आज जंतरमंतरवरील आंदोलकांकडून संसदेवर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, सोमवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी काहीशी नरमाईची भूमिका घेत मर्यादित प्रमाणात मोर्चा काढण्याची मुभा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता जंतरमंतरवरील (Jantar Mantar Protest) आंदोलकांना दिल्लीच्या केरळ भवनापर्यंत मोर्चा काढता येणार आहे. मात्र, हे अंतर फक्त एक किलोमीटरचे आहे. त्यामुळे अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) हा प्रस्ताव मान्य करणार का, हे बघावे लागेल. (Jantar Mantar Protest in Delhi)
#WATCH | Delhi: Founding President of the Cockroach Janta Party, Abhijeet Dipke, says, "The biggest march in India's history is about to take place. For the past 10-12 years, attempts have been made to destroy democracy in this country. By sitting at Jantar Mantar for a month,… pic.twitter.com/9qjO1ACNtY
— ANI (@ANI) July 20, 2026
दिल्ली पोलिसांनी शनिवारी सोनम वांगचूक यांना उचलून नेल्यामुळे आता जंतरमंतरवरील आंदोलनाचे नेतृत्व अभिजीत दिपके करत आहेत. त्यांनी सोमवारी सकाळी जंतरमंतरवरील आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघणार आहे. गेल्या दहा-बारा वर्षांपासून देशातील लोकशाही संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, तुम्ही फक्त एक महिना जंतरमंतरवर बसून लोकशाही पुन्हा जिवंत केली आहे. देशभरातून अनेक लोक दिल्लीत येत आहेत. मी अमेरिकेत असताना याबाबत बोलत होतो तेव्हा मला सांगितले जायचे, हे फक्त सोशल मीडियावर चर्चेपुरते आहे, लोक रस्त्यावर येणार नाहीत. पण आज जंतरमंतरच्या परिसरातील चारही रस्ते गर्दीने भरुन गेले आहेत. जे कोणी करु शकत नव्हते, ते आपण करुन दाखवले आहे. एवढा मोठा मोर्चा किंवा आंदोलन देशात शेवटचं कधी झालं होतं? हा आपला पहिला विजय आहे. कालपर्यंत जे पोलीस आपल्याला परवानगी देत नव्हते, ते आज कोणत्या मार्गाने जाणार, हे विचारत आहेत, असे अभिजीत दिपके यांनी म्हटले.
यावेळी अभिजीत दिपके यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. 'मोदी तेरी तानाशाही नही चलेगी', अशा घोषणा त्यांनी दिल्या. यानंतर आंदोलनकांनीही 'जय भीम, जय संविधान'च्या घोषणा दिल्या.
आणखी वाचा
Before You Go
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha






















