एक्स्प्लोर

Shirdi Crime: शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ

Shirdi Crime: साई मंदिराच्या चार नंबर प्रवेशद्वारासमोर भरगर्दीच्या ठिकाणी काकडी-कैरी विकणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे.

Shirdi Crime: साईबाबांच्या (Sai Baba) शिर्डी (Shirdi) शहरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साई मंदिराच्या (Sai Temple) चार नंबर प्रवेशद्वारासमोर (Gate Number 4) भरगर्दीच्या ठिकाणी काकडी-कैरी विकणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे मंदिर परिसरात आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

जयश्री साईनाथ क्षीरसागर (वय 30) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने साई संस्थानच्या (Sai Sansthan) सुपर स्पेशालिटी रुग्णालयात (Super Specialty Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Shirdi Crime: नेमकी घटना काय?

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जयश्री क्षीरसागर या साई मंदिराच्या गेट समोर गेल्या अनेक दिवसांपासून काकडी आणि कैरी विकण्याचा व्यवसाय करतात. रविवारी नेहमीप्रमाणे गर्दी असताना अचानक 3 ते 4 अज्ञात महिलांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने अचानक वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, क्षीरसागर या जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी (Shirdi Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

Shirdi Crime: हल्ल्याचे कारण अस्पष्ट; पोलिसांकडून तपास सुरू

अतिशय वर्दळीच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या साई मंदिर परिसरात हा प्रकार घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, या हल्ल्याचे नेमके कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.   

Shirdi Crime: आपली शिर्डी सुरक्षित आहे का? जखमी महिलेच्या पतीचा संतप्त सवाल

या घटनेनंतर जखमी जयश्री क्षीरसागर यांच्या पतीने माध्यमांशी बोलताना आपले दुःख आणि रोष व्यक्त केला. "माझी पत्नी साई मंदिर परिसरात काकडी-कैरी विकण्याचा बऱ्याच दिवसांपासून व्यवसाय करते. माझ्या पत्नीवर हल्ला झाल्याने माझी पत्नीची तब्बेत अत्यंत गंभीर आहे. साई मंदिर परिसरात महिला चाकू घेऊन फिरायला लागल्या आहेत. आपली शिर्डी सुरक्षित आहे का? तीन-चार मुलींनी माझ्या पत्नीला चाकू मारल्याची माहिती मला मिळाली. माझ्या पत्नीचे कुणासोबत काहीच वाद नाही. नेमके या घटनेचे कारण काय? याबाबत मला काहीच माहिती नाही," अशी प्रतिक्रिया जखमी महिलेच्या पतीने दिली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget