एक्स्प्लोर

BLOG : आमरण उपोषणाचा धक्कादायक जागतिक आविष्कार!

BLOG : सोनम वांगचूक यांची जबरदस्तीने धरपकड केल्यानंतर आमरण उपोषण पुन्हा एकदा चर्चेत आलेय. आमरण उपोषण हे व्यवस्थेविरोधातील आंदोलनाचे एक प्रभावी अस्त्र! भारतात त्याचा वापर बऱ्यापैकी केला जातो, जगभरातही अनेक देशात ह्या शांततेच्या गांधीवादी आंदोलन पद्धतीची भुरळ पडली आहे. ही नोंद आहे उत्तर आयर्लंडमधील आमरण उपोषणाची! हे उपोषण विलक्षण गाजले ते त्यातील भयंकर गोष्टींनी, उपोषणाने झालेल्या दहा जणांच्या मृत्यूने!   

युनायटेड किंगग्डमचा घटक असणाऱ्या, उत्तर आयर्लंडमध्ये अनेक दशके कॅथोलिक आयरिश राष्ट्रवादी आणि ब्रिटनशी एकनिष्ठ प्रोटेस्टंट यांच्यात संघर्ष सुरू होता. या संघर्षाला पुढे 'द ट्रबल्स' म्हणून ओळखले जाऊ लागले. आयरिश रिपब्लिकन आर्मी (आयआरए) या सशस्त्र संघटनेचे अनेक कार्यकर्ते ब्रिटिश सरकारने अटक करून मेझ तुरुंगात डांबले. 1976 पर्यंत या कैद्यांना राजकीय कैद्याचा दर्जा दिला जात होता; परंतु आयर्लंड द्वेषी ब्रिटिश सरकारने तो दर्जा काढून टाकला आणि त्यांना सामान्य गुन्हेगारांप्रमाणे वागवण्यास सुरुवात केली. हाच पुढील संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला.

राजकीय कैद्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला. सुरुवातीला त्यांनी तुरुंगातील गणवेश घालण्यास नकार दिला. त्यांना कपडे नाकारले गेल्यावर त्यांनी केवळ अंगावर चादर गुंडाळून राहण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाला ब्लॅंकेट प्रोटेस्ट असे नाव मिळाले. त्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली. 

कैद्यांनी कोठड्या स्वच्छ करण्यासही नकार दिला. मारहाण, अपमान आणि अमानुष वागणूक यांचा निषेध म्हणून त्यांनी स्वतःच्या कोठड्यांच्या भिंतींवर मलमूत्र फासले. या टप्प्याला डर्टी प्रोटेस्ट म्हणून इतिहासात नोंदवले गेले. मानवी प्रतिष्ठा आणि राजकीय ओळख यासाठी सुरू झालेला हा संघर्ष दिवसेंदिवस अधिक टोकदार होत गेला.

अखेरीस 1 मार्च 1981 रोजी या संघर्षाने सर्वांत भीषण वळण घेतले. आयरिश रिपब्लिकन नेता बॉबी सँड्स यांनी आमरण उपोषण सुरू केले. मागण्या फारशा अवास्तव नव्हत्या. कैद्यांना तुरुंगाचा गणवेश घालण्यास भाग पाडू नये; त्यांना तुरुंगातील सक्तीच्या कामातून सूट मिळावी; इतर राजकीय कैद्यांशी मुक्त संपर्क ठेवता यावा; शिक्षण आणि विरंगुळ्याच्या सुविधा मिळाव्यात; तसेच शिक्षा कमी करण्याचे पूर्वीचे अधिकार पुन्हा लागू करावेत. या मागण्या फाईव्ह डिमांड्स  Demands म्हणून प्रसिद्ध झाल्या.

या उपोषणाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व कैद्यांनी एकाच दिवशी उपोषण सुरू केले नाही. एका मागोमाग एक कैदी उपोषणात सहभागी होत गेला. त्यामुळे प्रत्येक मृत्यूनंतर आंदोलनाची तीव्रता कमी होण्याऐवजी वाढत गेली. प्रत्येक नव्या उपोषणकर्त्याने आधीच्या मृत सहकाऱ्याचा धागा जोडला आणि जगाला पुन्हा एकदा ब्रिटिश सरकारकडे पाहण्यास भाग पाडले. ह्या आंदोलनावर डेव्हिड बेरेसफर्ड यांनी, 'टेन मेन डेड : द स्टोरी ऑफ द १९८१' हे विलक्षण पुस्तक लिहिले. त्यांचे पुस्तक जागतिक पातळीवर नावाजले गेले! मात्र सुरुवातीला कौतुक करणार लोक देखील त्यांच्या विरोधात गेले!

उपोषण सुरू असतानाच घडलेली एक घटना या पुस्तकाचा भावनिक आणि राजकीय केंद्रबिंदू ठरते. उपोषणाच्या काळात फमानुह आणि साउथ टायरोन या मतदारसंघातून झालेल्या पोटनिवडणुकीत बॉबी सँड्स यांनी उमेदवारी दिली आणि ते ब्रिटिश संसदेवर निवडून गेले. तुरुंगात असलेला उपोषणकर्ता खासदार बनल्याची ही अभूतपूर्व घटना होती. या विजयाने जगभरातील माध्यमांचे लक्ष उत्तर आयर्लंडकडे वेधले. ब्रिटिश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव निर्माण झाला. तरीही त्यांनी आपली भूमिका बदलण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांचे प्रसिद्ध विधान होते—"Crime is crime; it is not political." त्यांच्या दृष्टीने हे कैदी राजकीय नव्हते, तर गुन्हेगार होते.

दिवसागणिक उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत जाते. शरीर क्षीण होत जाते, दृष्टी धूसर होते, बोलण्याची ताकद कमी होते, स्मरणशक्ती ढळू लागते आणि अखेरीस शरीरातील प्रत्येक अवयव मृत्यूकडे झुकू लागतो. पण या शारीरिक विघटनापेक्षाही, अधिक खोलवर नोंद पुस्तक आपण होऊन करते!आणि ती म्हणजे,  ती मानसिक दृढतेची. प्रत्येक कैद्याला माहीत असते की हा मार्ग मृत्यूकडेच जात आहे; तरीही ते मागे हटत नाहीत. त्यांचा विश्वास असतो की, व्यक्तीचा मृत्यू हा सामूहिक प्रतिष्ठेपेक्षा मोठा असू शकत नाही.

5 मे 1981 रोजी उपोषणाच्या ६६व्या दिवशी बॉबी सँड्स यांचा मृत्यू होतो. त्यांच्या अंत्ययात्रेला लाखो लोक उपस्थित राहतात. त्यानंतर फ्रान्सिस ह्यूजेस, रेमंड मॅक्रीश, पॅट्सी ओ'हारा, जो मॅकडॉनेल, मार्टिन हर्सन, केविन लिंच, किरन डोहर्टी, थॉमस मॅकएल्वी आणि अखेरीस मायकेल डिव्हाइन असे एकामागून एक दहा उपोषणकर्ते मृत्युमुखी पडतात. प्रत्येक मृत्यू उत्तर आयर्लंडमध्ये संतापाची नवी लाट निर्माण करतो. निदर्शने, दंगली आणि आंतरराष्ट्रीय निषेध यामुळे हा संघर्ष जागतिक चर्चेचा विषय बनतो.

पुस्तकाची सर्वांत मोठी ताकद म्हणजे लेखक कोणत्याही बाजूचा प्रचारक बनत नाही. डेव्हिड बेरेसफर्ड यांनी तुरुंगातील कैदी, त्यांचे कुटुंबीय, ब्रिटिश अधिकारी, डॉक्टर, धर्मगुरू आणि राजकीय नेते यांच्याशी केलेल्या संवादांवर आधारित हा वृत्तांत उभा केला आहे. त्यामुळे हे पुस्तक एकाच वेळी मानवी शोकांतिका, राजकीय संघर्ष आणि नैतिक द्वंद्व यांचे दस्तऐवज बनते. लेखक कैद्यांचे गौरवीकरण करत नाही आणि ब्रिटिश सरकारचे एकांगी राक्षसीकरणही करत नाही; तो घटनांना त्यांच्या संपूर्ण गुंतागुंतीसह मांडतो.

डेव्हिड बेरेसफर्ड यांनी लिहिलेले  'टेन मेन डेड : द स्टोरी ऑफ द 1981' हे केवळ एका उपोषणाचे वृत्तांतात्मक पुस्तक नाही; ते विसाव्या शतकातील सर्वाधिक वेदनादायी आणि राजकीयदृष्ट्या परिणामकारक संघर्षांपैकी एका संघर्षाचे जिवंत दस्तऐवजीकरण आहे. 1981 साली उत्तर आयर्लंडमधील बेलफास्टजवळील 'मेझ' तुरुंगात दहा आयरिश रिपब्लिकन कैद्यांनी केलेल्या आमरण उपोषणाची ही कथा आहे. या उपोषणाने केवळ दहा जणांचे प्राण घेतले नाहीत; तर ब्रिटिश राजकारण, आयरिश राष्ट्रवाद आणि उत्तर आयर्लंडच्या संघर्षाच्या इतिहासाला कायमचे वळण दिले.

जनतेने न्याय मागण्यांसाठी केलेली आंदोलने सत्तेत असणाऱ्या लोकांकडुन दडपली जातात हा इतिहास आहे, मात्र ही दडपशाही कशा पद्धतीची असते आणि ती कधी व कुणामार्फत केली जाते ह्यावर खूप काही अवलंबून असते; त्यावर अख्खे जग लक्षात ठेवून असते. वांगचूक यांचे आंदोलन चिरडण्यासाठी पांढरी चादर आडवी धरून कृष्णकृत्य लपवू शकता मात्र सत्य लपवू शकत नाही. आगामी काळात वांगचूक यांच्या आंदोलनस्थळी लाठीमार अथवा बळाचा सक्तीने केलेला वापर पाहायला मिळाला तरी नवल वाटणार नाही. डोळे कान बंद करून बसलेली सत्ता तुलनेने अधिक नीच असते मात्र ती विसरत असते की, जिथे उदय आहे तिथे अस्तही असतो ! आणि हे सूत्र कुणालाही टळले नाही!

नोंदी - बाराव्या शतकात 1169 मध्ये इंग्लंडने आयर्लंडवर आक्रमण करून हळूहळू आपला ताबा मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी आयरिश लोकांवर अनेक अत्याचार केले, त्यांच्या जमीनी बळकावल्या आणि दंडात्मक कायदे लादले. 1801 च्या 'अॅक्ट ऑफ युनियन'मुळे आयर्लंड अधिकृतपणे युनायटेड किंगडमचा (United Kingdom of Great Britain and Ireland) भाग बनला. 

दीर्घ संघर्षानंतर आणि 1919 ते 1921 दरम्यान झालेल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर, अखेर 1922 मध्ये आयर्लंडला स्वातंत्र्य मिळाले. मात्र,असे असले तरी आयर्लंडच्या उत्तरेकडील सहा प्रांत युनायटेड किंगडमचा भाग राहिले, ज्याला आज 'उत्तर आयर्लंड' म्हणून ओळखले जाते. हा भाग आजही युनायटेड किंगडमचा एक भाग आहे. तिथे आजही स्वातंत्र्याची आस अनुभवता येते!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी  4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
Advertisement

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी  4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!

Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
Embed widget