Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
वांगचुक यांनी उद्या मोर्चाची हाक देण्याचं कारण संसदेचं पावसाळी अधिवेशन... उद्यापासून सुरू होणारं हे अधिवेशन साधारण चार आठवडे चालेल... विरोधकांच्या भात्यात यावेळी अनेक आक्रमक आयुधं असल्याचं दिसत असलं तरी पक्षफुटीमुळे घटलेलं संख्याबळ ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब बनलीये... विशेष अधिवेशनात फेटाळली गेलेलं महत्त्वाचं घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा आणली जाण्याची शक्यता असल्यामुळे राजकीय निरीक्षकांचं या अधिवेशनाकडे खास लक्ष असेल... बघुयात एबीपी माझाचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांचा नवी दिल्लीहून हा स्पेशल रिपोर्ट...
अधिवेशनाच्या आदल्या दिवशी, रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीतच भावी संघर्षाचं बीज रोवलं गेलंय...
तृणमूल काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत पडलेल्या फुटीचे पडसाद बैठकीत उमटल्याचं दिसलं...
तृणमूलच्या फुटीर खासदारांनी प्रवेश केलेल्या एनसीपीआय या पक्षालाही सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं...
मात्र या पक्षाला कोणतीही मान्यता नसताना आणि फुटलेल्या २० खासदारांच्या अपात्रतेची याचिका प्रलंबित असताना...
एनसीपीआयला बैठकीचं निमंत्रण देण्यावर तृणमूल काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतला...
All Shows





महत्त्वाच्या बातम्या



























