Aryan Khan : आर्यन खान प्रकरणात शिवसेनेचे किशोर तिवारी न्यायालयात; सूमोटो दाखल करण्याची मागणी
शिवसेना नेते किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी आर्यन शाहरुख खान प्रकरणात सर्वोच्च न्यायालय गाठले आहे. एक पत्र लिहून तिवारी यांनी एनसीबीच्या विरोधात तक्रार करत मानवाधिकार जपण्यासाठी आणि सत्तेचा गैरवापर थांबावावा यासाठी सूमोटो ह्या प्रकारणाची दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.
कोर्टाकडून उच्च स्तरीय चौकशीची मागणी किशोर तिवारी ह्यांनी केली आहे. 17 दिवस आर्यन खान हा जेल मध्ये असून त्यात दिरंगाई होत असल्याचा आक्षेप घेत गेल्या काही काळापासून एनसीबी ही फिल्म इंडस्ट्री व मॉडेल्सला हेतूपुरस्सर टार्गेट करत असल्याचे ही म्हटले आहे. नाव न घेता एनसीबी अधिकारी समीर वानखेडे व अभिनेत्री बायको क्रांती रेडकर ह्यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत हे रेडकर ह्यांच्या करिअरशी ही ह्याचा संबंध लावला आहे.


















