एक्स्प्लोर
Porsche BMW Crash | बेदरकार रेस, पोर्शे-बीएमडब्लू कारचा मुंबईत भीषण अपघात
पश्चिम द्रुतगती महामार्गावर मध्यरात्री Porsche आणि BMW या दोन कारची रेस सुरू होती. बोरिवलीकडून वांद्र्याच्या दिशेने जात असताना, जोगेश्वरीजवळ मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास Porsche कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. कार डिव्हायडरवर आदळली आणि चार ते पाच वेळा पलटी झाली. या अपघातात Porsche कारचा चक्काचूर झाला आहे. कारचे भाग तुटून वेगळे झाले आहेत. अपघातग्रस्त Porsche कार दादरा नगर हवेली पासिंगची असल्याची माहिती आहे. अपघातात Porsche कार चालक जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोगेश्वर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत. चालक नशेत होता का, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
पुणे
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
















