Shardiya Navratri 2020 | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबादेवी मंदिराकडून ऑनलाईन दर्शनाची सोय
आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात होत आहे. नवरात्रीचं पावन पर्व दुर्गामातेसाठी समर्पित आहे. देवी दुर्गेला शक्ती आणि उर्जेचं प्रतिक मानलं जातं. नवरात्रीत दुर्गेच्या सर्व नऊ रुपांची विधिवत पूजा अर्चा केली जाते. असं मानलं जात की, नवरात्रीच्या पावन पर्वात देवी दुर्गेची पुजा करून घटस्थापना केल्याने मनातील सर्व इच्छा आकांशा पूर्ण होतात.
नवरात्रीच्या पुजेमध्ये नियमांचं विशेष महत्त्व सांगण्यात आलं आहे. माता दुर्गा नियम आणि कडक शिस्तीसाठी ओळखलं जाणारं देवीचं रुप आहे. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच म्हणजेच, घटस्थापनेच्या दिवशी देवीची विधिवत पुजा करणं महत्त्वाचं ठरतं. नवरात्रीच्या पावन पर्वाच्या पहिला दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. असं म्हटलं जातं की, पहिल्या दिवशीची पुजा विधिवत केल्याने देवीचा आशिर्वाद मिळतो. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच, घटस्थापना करण्यासाठीच्या सर्व विधी आणि नियम जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.