Pravin Raut ED Enquiry : संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार? प्रवीण राऊत यांना चौकशीसाठी नेणार दिल्लीत
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे... कारण संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेण्याची परवानगी कोर्टानं ईडीला दिली आहे...प्रवीण राऊत यांना काही विशेष अटीशर्तीवर ही परवानगी दिली आहे. पत्राचाळ प्रकरणी प्रवीण राऊत यांच्या जामीनावरील सुनावणीपर्यंत ईडीला प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसंच दिल्लीला नेण्यापूर्वी ईडीला कोर्टात हमीपत्र देण्याचेही निर्देश आहेत... पर्ल्स अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी प्रवीण राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. पीएसीएलने शेतजमिनीच्या विक्री आणि विकासाच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून 49 हजार 100 कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप आहे. दरम्यान संजय राऊत यांनाही आज ईडी चौकशीला हजर राहण्यासाठी आदेश होते... मात्र आजही ते हजर राहणार नसल्याची माहिती आहे.