(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Remdesivir Injection : मुंबईत छापे टाकून 272 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
Remdesivir Injection : मुंबईत छापे टाकून 272 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
राज्यात एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे लसीचा तुटवडा आहे. यातच मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला हा आरोपी रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारा होता. अटक केलेल्या व्यक्तीकडून रेमडेसिवीरच्या 12 लसी (इंजेक्शन) जप्त करण्यात आले असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
मुंबई गुन्हे शाखेने अधिकाऱ्यांना त्यांच्या खबरीकडून माहिती मिळाली होती की अंधेरी ते जोगेश्वरी परिसरामध्ये रेमडीसीवीरचा काळाबाजार केला जात आहे, या महितीच्या आधारे गुन्हे शाखा क्रमांक 10 ने सापळा रचला आणि त्या परिसरामध्ये छापेमारी सुरू केली. छापेमारी मध्ये रेमडेसिवीरच्या 12 लस सापडल्या, ज्याच्याकडे ही लस सापडली त्या व्यक्तीला गुन्हे शाखेने अटक केली आहे.