Pratap Sarnaik on Pro Govinda : मुंबईतील वरळी डोम येथे होणार प्रो गोविंदा स्पर्धा ABP Majha
Pratap Sarnaik on Pro Govinda : मुंबईतील वरळी डोम येथे होणार प्रो गोविंदा स्पर्धा ABP Majha
मुंबई आणि ठाण्यानं अवघ्या देशभरात लोकप्रिय केलेली दहीहंडी आता स्पर्धात्मक रुपात पाहायला मिळणार आहे. प्रो कबड्डीच्या धर्तीवर यंदा पहिल्यांदाच मुंबईतल्या एनएससीआय डोममध्ये प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या वतीनं या स्पर्धेचं येत्या २७ ऑगस्टला आयोजन करण्यात येईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रो गोविंदा स्पर्धा खेळवण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या दहीहंडी समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी प्रामुख्यानं मुंबई आणि ठाण्यात खेळल्या जाणाऱ्या दहीहंडीला साहसी क्रीडाप्रकाराचा दर्जा आधीच देण्यात आला आहे. त्यानंतर आता दहीहंडीला स्पर्धात्मक रुपात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, पारंपरिक दहीहंडीतल्या गोविंदा पथकांना विमा कवच देण्याची मागणी समन्वय समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आली आहे. तसंच न्यायालयाच्या सूचनेनुसार १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडीत सहभागी न करून घेण्याचंही आपल्याला मान्य असल्याचं आमदार प्रताप सरनाईकांनी सांगितलं.