#SSR कुटुंबाची तक्रारच नसल्याने मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही, सुशांत प्रकरणात गृहमंत्र्यांचं वक्तव्य
मुंबई पोलिसांनी सुशांतसिंह प्रकरणात एफआयआर का देखील नाही, या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख म्हणाले, 'सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी कोणावरही संशय नाही असे लिहून दिले होते, मग गुन्हा कोणावर दाखल करायचा.' शासनात काम करताना अनेकांना अशा गोष्टी होतात. पंतप्रधानांना देखील फोन आले आहेत. त्यामुळे धमकीचे फोन येणे यात काही मोठी गोष्ट नाही.
मुंबईत ड्रग्जची कीड अनेक वर्षांपासूनची कीड आहे. सुशांतसिंह प्रकरणामुळे अनेक गोष्टी समोर होत आहे. त्यांची योग्य ती चौकशी होईल. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ही देशातील मोठी संस्था आहे. याचे जाळे भारतभर आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बड्या नेत्यांच्या मुलांची नावे आहे. या संदर्भात खोलवर चौकशी केली पाहिजे.























