एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Open Manhole Death | कल्याणमध्ये MIDC च्या उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू, सदोष मनुष्यवधाची मागणी
कल्याणमधील शिळ रोड परिसरात कुंभवली एमआयडीसीच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टाटा पॉवर जवळच्या गांधीनगरमध्ये हा प्रकार घडला. बाबू चव्हाण असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते रस्त्याने चालत असताना अचानक चेंबरमध्ये पडले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. स्थानिकांनी त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कल्याण शिळ रोडवरील या भागात उघड्या चेंबर्सच्या संदर्भात नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, एमआयडीसीने या तक्रारींकडे वारंवार दुर्लक्ष केले. त्यामुळे चव्हाण यांच्या मृत्यूसाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केली आहे. "एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवरती आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा," अशी त्यांची मागणी आहे.
मुंबई
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Dadar Bhiwandi Fire Alert: भिवंडी, दादरमध्ये आगीचे तांडव, प्रचंड नुकसान
Railway Protest: 'अभियंत्यांवरील गुन्हा मागे घ्या', CSMT वरील आंदोलनामुळे 2 प्रवाशांचा मृत्यू
Mumbai Rail Andolan: 'एक प्रवाश्याचा मृत्यू, तीन जखमी', रेल्वे कर्मचारी आंदोलनामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात
Indurikar Maharaj Controversy :लेकीचा शाही थाट, इंदोरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























