Disha Salian मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी Narayan, Nitesh Rane यांना अटी-शर्तींसह जामीन
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. नारायण राणे आणि दिशा सालियन मृत्यू (Disha Salian Case) प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दिंडोशीतील सत्र न्यायालयानं आज निर्णय दिला. न्यायालयानं या प्रकरणी राणे पिचा-पुत्रांना दिलासा दिला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वकील सतिश मानेशिंदे म्हणाले की, "केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पंधरा हजार रुपयांच्या हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी अशा प्रकारच्या शुल्लक केसेसकडे लक्ष न देता, ज्या क्रिमिनल केसेस आहेत, त्याकडे जास्त लक्ष द्यावं, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल."




















