Musical jogging track : मुलंडमधील म्युझिकल जॉगिंग ट्रॅक, काय आहे म्युझिकल जॉगिंग ट्रॅकची संकल्पना
Musical jogging track : जर भोंगे लावायचे नसतील तर धार्मिक उत्सव किंवा रोजच्या प्रार्थना लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर कोणती संकल्पना उत्कृष्ट आहे, याचा शोध घ्यायचा प्रयत्न आम्ही केला. आणि आपल्या मुंबईतच 2002 पासून एक मॉडेल अस्तित्वात आहे याचा शोध आम्हाला लागला. मुलुंड येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्युझिकल जॉगिंग ट्रॅक ही एक अशी संकल्पना आहे. ज्यामुळे जॉगिंग ट्रॅकवर चालणाऱ्या नागरिकांना भक्ती संगीतासोबत जुनी गाणी ऐकायला मिळतात, मात्र रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना याचा अजिबात त्रास होत नाही. या जॉगिंग ट्रॅकवर स्पीकरची यंत्रणा अशाप्रकारे उभी केली आहे की त्याच्या त्रास कोणाला होत नाही. तसेच ध्वनिप्रदूषण देखील होत नाही























