Mumbai Night Curfew | हम नही सुधरेंगे! मुंबईत रात्रीच्या संचारबंदीचं उल्लंघन
लंडनमध्ये (Coronavirus) कोरोनाचा नवीन प्रकार सापडल्यानंतर आणि सध्याच्या कोरोनाची परिस्थिती पाहता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोकांची गर्दी होऊ नये म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्र आणि (Mumbai) मुंबईसह इतर महानगरपालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यूची घोषणा केली. मात्र काही नागरिकांनी नाईट कर्फ्यूला गांभीर्याने न घेतल्याचं गंभीर दृश्य सध्या पाहायला मिळत आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर रात्री एक वाजण्याच्या सुमारासही राजरोसपणे बार उघडून दारूविक्री सुरु असल्याची धक्कादायक माहिती एबीपीच्या रिअॅलिटी चेकमध्ये समोर आली. इतकंच नव्हे, तर खाण्याचे पार्सल देण्याचं सत्रही सुरु असून, ते घेणाऱ्यांचीही गर्दी काही कमी नाही हीच बाब पाहायला मिळाली. नियम लागू झाल्यापासून सर्व काही बंद असताना सकाळी 3 ते 4 वाजे पर्यंत पार्सल सुरू असल्याची धक्कादायक बाबही आढळून आली.
मुख्य म्हणजे नाईट कर्फ्यू आणि संचारबंदीचे नियम लागू करतेवेळी यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आल्याचीच बाब यंत्रणांकडून स्पष्ट करण्यात आली होती. पण, यातही आता प्रश्न असा की, दारू जीवनावश्यक वस्तूंमध्ये येते का ? आणि दारू-मौज मजेसाठी कोरोनासारख्या जीवघेण्या आजारालासुद्धा लोकं जुमानत नाहीत का?