(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Nalesafai : मुंबईतील नालेसफाईचा फॅक्ट चेक! महानगर पालिकेची पोलखोल ABP Majha
पावसाळ्यापूर्वी मुंबईत महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांनी आपल्या हद्दीतील नालेसफाई झाल्याचा दावा केलाय. मात्र प्रत्यक्षात ही नालेसफाई झाली नसल्याचा पाहायला मिळतय. मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात येणाऱ्या ट्रॅक दरम्यानच्या नाल्यात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळतय. रेल्वेच्या ट्रॅक वरील नाल्यांबाबत फॅक्ट चेक केलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी....
हे देखील व्हिडिओ पाहा
Digitally signed 7 12, 8A : डिजीटल सातबारा काढा मोबाईलमध्ये! असे करा डाउनलोड ABP Majha
येत्या काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकरी आता शेतीच्या कामामध्ये गुंतणार आहे. यासोबतच शेतकऱ्याला पिक विमा किंवा पीक कर्ज काढण्यासाठी सातबाराची गरज भासते. तर आजच्या या व्हिडिओतून आपण ऑनलाईन सातबारा घरबसल्या कसा काढायचा याचीच माहिती जाणून घेणार आहोत.
1) सर्वात आधी तुम्हाला गुगल वरती डिजिटल साइन सातबारा असं टाईप करायचं आहे.
2) त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारची महाभूमिलेख ही वेबसाईट आली असेल. आता तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे.
3) त्यानंतर तुमच्यासमोर एक होम स्क्रीन आली असेल जर तुम्ही या वेबसाईट वरती आधीच लॉगिन केले असेल तर तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
4) आणि जर तुम्ही पहिल्यांदा सातबारा काढत असाल तर तुम्हाला खाली नवीन नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे.
5) त्यासाठी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचा आहे.
6) आता तुमच्या समोर एक फॉर्म आला असेल तो फॉर्म पूर्णपण भरून घ्या.
7) डिजीटल सातबारा काढण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारला 15 रुपये पे करावे लागतील. त्यासाठी तुम्हाला काही तुमचं अकाउंट रिचार्ज करायचं आहे.
8) खाली असलेल्या रिचार्ज या ऑप्शनवर क्लिक करा.
09)त्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यावर 15 रुपये पासून ते 1000 रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता.
10) आता तुम्हाला जेवढी रक्कम जमा करायची आहे ते टाका.
11) त्यानंतर तुमच्यासमोर पेमेंट करण्यासाठी अनेक ऑप्शन आले असतील. जसे की. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, युपीआय.. आता प्रत्येक जण फोनमध्ये युपीआय वापरतो म्हणून आपण युपीआयद्वारे पेमेंट करुयात...
12) त्यानंतर जर तुमच्याकडं युपीआय आयडी असेल तर ते टाका किंवा QR कोड स्कॅन करून देखील तुम्ही पेमेंट करू शकता.
13) पेमेंट झाल्यावर तुमच्या स्क्रिनवर पेमेंट सक्सेसफुल असं आलं असेल...
14) त्यानंतर आता तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे. आणि खाली तुमचा गट क्रमांक टाकायचं आणि डाऊनलोड बटनवर क्लिक करायचं आहे.
15) त्यानंतर वरची तुम्हाला एक नोटीफिकेशन पाठवण्यात येईल. त्यात सांगितलं आहे. की प्रत्येक डिजीटल सातबारा काढण्यासाठी 15ल रुपये मोजावे द्यावे लागतील. त्यावर ओके करा.
16) आता तुमचा डिजीटल सातबारा डाऊनलोड झाला असेल...