एक्स्प्लोर
Mumbai Local Derailment at CSTM : लोकलचा घसरलेला डबा रुळावर, लोकल कारशेडकडे रवाना
Mumbai Local Derailment at CSTM Update : मुंबईत सीएसएमटी (CSMT) स्थानकात लोकलचा छोटा अपघात झाला होता. त्यामुळे हार्बर मार्गावरील (Harbour Line) सेवा विस्कळीत झाली होती. ती आता पूर्ववत करण्यात आली आहे. दुपारी 12.11 मिनिटांनी घसरलेली लोकल रवाना झाली आहे. सकाळी 9 वाजून 39 मिनिटांनी CSMT वरुन पनवेलला जाणारी लोकल पुढे जाण्याऐवजी मागे बफरला धडकली आहे. त्यामुळे एक डबा रुळावरुन घसरला होता. या अपघातामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. हार्बर मार्गावरील अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या.
सीएसएमटी (CSMT) स्थानकात केवळ 2 प्लॅटफॉर्म हार्बर मार्गासाठी (Harbour Line) आहेत. त्यातल्या एका प्लॅटफॉर्मवर अपघात झाल्यानं एकच प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी उपलब्ध होता. त्यामुळे हार्बर मार्गावर लोकल गाड्यांच्या खोळंबा होऊन वाहतूक विस्कळीत झाली होती. आता सर्व यंत्रणांनी तब्बल दोनच तासांत रुळावरुन घसरलेली लोकल मार्गी लावली आहे. त्यामुळे आता वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येणार आहे.
मुंबई
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























