एक्स्प्लोर

Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला

Strait of Hormuz : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाजं सोडायची यासंदर्भातील निर्णय इराणकडून घेण्यात आला आहे. यामुळं होर्मुझवर आता इराणचं पूर्णपणे नियंत्रण असल्याचं दिसून येतं.

Strait of Hormuz नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्त्रायलनं इराणवर 28 फेब्रुवारीला हल्ले केले. त्यानंतर तब्बल 40 दिवसांनी अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली आहे. या शस्त्रसंधीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी सुरु ठेवावी लागेल, असं म्हटलं होतं. मात्र, 28 फेब्रुवारीपूर्वी जी होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होती, त्यावर आता इराणचं नियंत्रण आहे. अमेरिकेसोबत शस्त्रसंधी केली असली तरी या मार्गानं एका दिवसात 15 जहाजं मार्गक्रमण करतील, असं इराणकडून सांगण्यात आलं आहे. आयआरजीसीच्या सूत्रांच्या मते होर्मुझमध्ये यूद्धपूर्व स्थिती निर्माण होण्यास खूप वेळ लागणार आहे.  

रशियन वृत्तसंस्था तास नुसार इराणच्या एका वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शस्त्रसंधीनंतर इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी युद्धपूर्व स्थितीत जाऊ देणार नाही.सूत्रांच्या माहितीनुसार इराण होर्मुझवरील पकड कमजोर होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. आता कोणत्याही जहाजाला होर्मुझमधून मार्गक्रमण करायचं असल्यास इराणच्या विशिष्ट प्रोटेकॉलचं पालन करावं लागेल. यानंतर देखील इराण एका दिवसात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून 15 पेक्षा अधिक जहाजांना मार्गक्रमण करण्यास परवानगी देणार नाही. सूत्रांच्या मते अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीत देखील एका दिवसात 15 जहाजांना  मार्गक्रमण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी देखील इराणची परवानगी घ्यावी लागेल. होर्मुझच्या सुरक्षेची यंत्रणा आयआरजीसीकडून संचलित केली जाईल. यामुळं होर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धपूर्व स्थिती निर्माण होण्यास खूप वेळ लागू शकतो.  

होर्मुझमधून 24 तासात 7 जहाजांचं मार्गक्रमण

अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर हल्ले थांबले असले तरी युद्धाचा परिणाम अजून कायम आहे. होर्मुझमधून युद्ध  सुरु होण्यापूर्वी एका दिवसात जवळपास 60 जहाजं मार्गक्रमण करायची. गेल्या 24 तासात केवळ 7 जहाजांनी होर्मुझमधून मार्गक्रमण केलं आहे. यापैकी बहुतांश जहाजं चीनची आहेत. त 

अमेरिकेला अटी मान्य करण्यास इराण भाग पाडणार

अमेरिका आणि इस्त्रायल यांनी इराणवर 28 फेब्रुवारीपासून हल्ले सुरु केले होते. तेव्हा कोणालाही वाटलं नव्हतं की इराणसोबत त्यांना शस्त्रसंधी करावी लागेल. यानंतर देखील होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण आहे. इराणनं दोन आठवड्यांची शस्त्रसंधी पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या विदेशातील गोठवण्यात आलेल्या संपत्तीला पूर्ववत करावं अशी मागणी केली आहे.

दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होणार आहे. या चर्चेसाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हॅन्स पाकिस्तानात दाखल झाले आहेत. आता अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेतून तोडगा निघतो का ते पाहावं लागेल. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Embed widget