Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
जिल्ह्यातील गहिनीनाथ गडावर आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर शेजारी शेजारी बसल्याचं दिसून आलं. दोघांचा एकमेकांशी मनमोकळा संवाद साधतानाचा व्हिडिओ देखील समोर आला. आता, याप्रकरणी सुरेश धसांनी भाष्य केलंय. धस-मुंडे संघर्ष अजून संपलेला नाही. संघर्ष सुरू राहील पण बाकीच्या ठिकाणी, हे अध्यात्माचे स्टेज आहे, इथे नो राजकारण, इथून रोडवर गेल्यावर राजकारण सुरू होईल अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताह निमित्त आमदार धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात जवळीकता पाहायला मिळाली. मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या भाषणात सुरेश धस यांचा उल्लेख केला. त्यामुळे, बीड (Beed) जिल्ह्यात मुंडे-धस यांच्यातला हा सुप्त संघर्ष मिटला का? असा प्रश्न प्रत्येकाला पडावा असेच चित्र आज पाहायला मिळालं. परंतु मुंडे- धस हा संघर्ष संपला नसल्याचं सुरेश धस यांनी ठामपणे सांगितलं.





















