Goregaon Firing : राजीव रंजन या व्यक्तीचं धक्कादायक कृत्य, दारूच्या नशेत स्वत:च्या घरात गोळीबार
Goregaon Firing : राजीव रंजन या व्यक्तीचं धक्कादायक कृत्य, दारूच्या नशेत स्वत:च्या घरात गोळीबार
मुंबईच्या गोरेगाव भागात रविवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. डीबी वूड्स या टोलेजंग इमारतीत राजीव रंजन या व्यक्तीनं दारूच्या नशेत घरातच गोळीबार केला. सुदैवानं त्यानं पत्नी आणि मुलाला आधीच घराबाहेर जाायला सांगितल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. शेजाऱ्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानं त्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलीस तातडीनं आलं आणि घरात शिरून रंजनला ताब्यात घेतलं. घरात पोलिसांना पती आणि पत्नीच्या परवान्यावर दोन पिस्तुलं आणि १२ जिवंत काडतुसं सापडली. पिस्तुलाचा गैरपावर केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी राजीव रंजनला शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत अटक केलीये.























