मुंबईत 100 हून अधिक कचरा वेचकांचं लसीकरण होणार, बामला फाऊंडेशन आणि क्लिनप फाऊंडेशनचा पुढाकार!
मुंबईत आज बामला फाऊंडेशन आणि क्लिनप फाऊंडेशनच्या माध्यमातून 100 पेक्षा जास्त कचरा वेचक कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अभिनेता अर्जुन कपूर, क्लीनप फाऊंडेशनच्या प्रमुख संजना रूणवाल उपस्थित होते. याबाबत बोलताना संजना रुणवाल म्हणाल्या की, आम्ही कचरा वेचक कर्मचाऱ्यांसाठी पुढील चार दिवसांसाठी लसीकरण मोहीम राबवणार आहोत. यावेळी 100 पेक्षा जास्त कचरा वेचकांचं लसीकरण होईल. अशाच प्रकारचा उपक्रम आम्ही पुढील काळात देखील राबवणार आहोत. जास्तीत जास्त फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. याआधी आम्ही या नागरिकांना गम बूट देणं, रेन कोट देणं, त्यांचे आरोग्य विमा काढणे, मेंटल हेल्थ प्रोग्रॅम राबवणं अशी कामे केली आहेत.पुढील काळात देखील आमचे अशाप्रकारचे उपक्रम सुरू राहणार आहेत.























