"मनोज पाटीलने एक्सपायर झालेले स्टेरॉईड दिले होते", अभिनेता साहिल खानची एबीपीला EXCLUSIVE मुलाखत
मुंबई : 'मिस्टर इंडिया' पुरस्कार मिळवणारा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बॉडीबिल्डिंगच्या अनेक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय. मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये अभिनेता साहिल खान आपल्या आत्महत्येला जबाबदार असेल असा उल्लेख केला आहे. मनोज पाटीलने ठाण्यातील ओशिवरा पोलीस स्टेशनच्या नावे ही सुसाईड नोट लिहिली असून त्यामधून साहिल खानला योग्य ती शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे. साहिल खानने स्टाईल या चित्रपटात काम केलं आहे.























