Manoj Jarange Mumbai : मनोज जरांगेंचा मुंबईपर्यंतचा प्रवास कसा असणार ?
Manoj Jarange Mumbai : मनोज जरांगेंचा मुंबईपर्यंतचा प्रवास कसा असणार ? एकीकडे राज ठाकरे यांचा आज फोकस कोकणावर असताना, ज्या मुंबईतून राज ठाकरेंची राजकीय कारकीर्द बहरली.. ज्या मुंबईतून राज्याचा राजकीय आणि आर्थिक गाडा हाकला जातो.. त्याच मुंबईवर मराठा आंदोलनाचं मोठं वादळं निघणार आहे. गेल्या सात महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मुंबई येण्याचा मार्ग जाहीर केला..त्याआधी आज सकाळी अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अंतरवाली सराटी गाठलं.. आणि मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी जरांगे आणि बच्चू कडूंमध्ये सगेसोयरे प्रस्तावावर चर्चा झाली. जरांगेंनी सरकारच्या ड्राफ्टमध्ये बदल सुचवत रक्ताच्या नात्याच्या सगेसोयऱ्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची मागणी केलीय. तर यासाठी आंदोलनाआधी म्हणजे १९ जानेवारीला विशेष अधिवेशनाची मागणी जरांगेंनी केलीय.. तर आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलंय... याच चर्चेनंतर दोन्ही नेते काय म्हणालेत पाहुयात..