Manoj Bajpayee speech: आज 'या' विषयावर बोलावं लागतंय हे दुर्दैव, मनोज वाजपेयीचं भाषण - ABP Majha
सह्याद्री देवराई या संस्थेच्या वतीने मुंबईतील गोरेगाव येथील आरेच्या जंगलात आज वृक्ष लागवड करुन प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. यावेळी अभिनेते मनोज वाजपेयी, लेखक अरविंद जगताप आणि खासदार गजानन किर्तीकर उपस्थित होते. यावेळी बोलताना अभिनेते मनोज वाजपेयी म्हणाले की, सध्या पर्यावर रक्षणासाठी प्रत्येकाने पुढं येणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे कोणताही पर्याय राहिलेला नाही. आता ही पृथ्वी सांगत आहे की तुम्ही स्वतः ला वाचवा. जर हे केलं नाहीं तर लवकरच पृथ्वीचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही. सह्याद्री देवराई ही संस्था कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीं त्यामुळे आता या संस्थेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. संस्था मला जी जबादारी देईल ते काम मी करणारं आहे.























