Mahim Dargah : माहीम दर्ग्यावर चादर चढवण्याचा मान महाराष्ट्र पोलिसांना
Mahim Dargah : माहीम दर्ग्यावर चादर चढवण्याचा मान महाराष्ट्र पोलिसांना मुंबईतल्या माहीमच्या हजरत पीर मखदुमशाह बाबा दर्ग्याचा उरुसाला आजपासून सुरुवात झाली. आता पुढचे दहा दिवस सर्वधर्मीय नागरिक या उरुसाचा म्हणजे जत्रेचा आनंद लुटता येणार आहे. माहीम पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मखदुमशाह बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवण्याचा मिळणारा पहिला मान हे उरुसाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढच्या दहा दिवसांत देशभरातून पाचशेहून अधिक मानाच्या चादर या दर्ग्यात येतील. माहीम पोलीस स्थानकाच्या ठिकाणी एका जमान्यात पीर मखदुमशाह बाबांची बैठक होती, असं सांगितलं जातं. माहीम पोलीस स्थानकाची स्थापना १९२३ साली झाली होती. त्यामुळं माहीम पोलीस स्थानकाच्या वरिष्ठ पलीस निरीक्षकानं दर्ग्यावर पहिली चादर घालण्याची परंपरा शंभर वर्षे सुरु आहे. माहीम पोलीस स्थानकामधून दरवर्षी वाजत गाजत निघणारी चादर घेऊन पोलीस कर्मचारी संपूर्ण माहीमला एक फेरी मारुन मखदुमशाह बाबांच्या दर्ग्यात चादर चढवतात. त्यावेळी मुंबई पोलिसांचं बॅण्डपथकही या परंपरेची शान आणखी वाढवतं.