Maharashtra : राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर; राज्य आणि केंद्राकडे केली 'ही' मागणी
राज्यभरातल्या रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण मार्डच्या रहिवाशी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मुंबईतल्या सायन रुग्णालयाबाहेर मार्डच्या निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरु केलंय. नीट-पीजी काऊन्सिलिंग पुढे ढकलण्यात आल्यानं मार्डचे डॉक्टर आक्रमक झालेत. देशात २७ नोव्हेंबरपासूनच डॉक्टरांचं आंदोलन सुरु आहे. राज्यातील मार्डच्या निवासी डॉक्टरांनी आजपासून संप पुकारलाय. डॉक्टरांची संख्या कमी आहे, अशातच उपलब्ध डॉक्टरांवर अधिक ताण येतोय. त्यामुळे केंद्रावर रोष व्यक्त करण्यासाठी आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी संपावर जात असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी प्राध्यापक वर्ग आणि इतर डाॅक्टर्स काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे.






















