Maharashtra Bhushan Death List : खारघर उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांची नावं...
नवी मुंबईच्या खारघरमध्ये रविवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुुरस्कार देण्यात आला... या कार्यक्रमाला लाखो श्रीसेवक आले होते..मात्र उष्माघातामुळे ११ श्रीसेवकांचा मृत्यू झाला. तर 15 श्रीसेवकांवर कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री रुग्णांची विचारपूस केली.. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. रविवारी एकूण ३०० श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला.. त्यातील अनेकांना प्राथमिक उपचार देऊन घरी सोडण्यात आलें.. मात्र ३२ जणांची प्रकृती गंभीर होती, त्यातील ११ जणांचा मृत्यू झाला.























