Mahalaxmi Racecourse :घोड्यांमार्फत विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास, Rotary Club Of Bombay चा उपक्रम
विद्यार्थ्यांना नेतृत्त्वगुण आत्मसात करण्यासाठी आणि भावनिक बुद्धिमत्तेवर कार्य करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्यावतीनं ‘भविष्य यान’ या कार्यक्रमांतर्गत एक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. ज्यात घोड्यांचा वापर करत काही विद्यार्थ्यांना नेतृत्व गुण कसे आत्मसात करायचे याचे धडे देण्यात येत आहे. बोलू न शकणाऱ्या मुक्या प्राण्यांशी आपल्या रिॲक्शन आणि हावभावच्या मार्फत संवाद साधत त्यांना कंट्रोल करणं अवघड असतं. अशातच आपल्या बौद्धिक क्षमतेची आणि नेतृत्व गुणांची कस लागत असते.
आपला बौद्धिक विकास देखील होत असतो. त्यामुळे घोड्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना आपला व्यक्तिगत विकास कसा करावा याचं ज्ञान ते ह्या प्राण्याशी संवाद साधत आत्मसात करत आहेत. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्यावतीनं सामान्य कुटुंबातील मुलांना नेतृत्व गुण मिळावेत यासाठी पुढाकार घेत महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर हा वर्कशॉ घेण्यात येत आहे.