नवी मुंबईत उद्या महामोर्चा, नेते,कार्यकर्त्यांना नोटिसा, दि बा पाटलांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त ठाम
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐवजी प्रकल्पग्रस्त नेते दि बा पाटील यांचे नावे द्यावे यासाठी स्थानिक आगरी कोळी जनतेने लढा पुकारला आहे. येत्या 24 जूनला सिडको वर महामोर्चा निघणार असून यात एक लाखांच्या वर आंदोलक सहभागी होतील असा दावा नामकरण कृती समितीने केलाय. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई पोलिसांनी शहरातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. जड वाहनांना 24 जून रोजी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तर हलक्या वाहनांचा मार्ग बदलला आहे. मुंबईहून पुण्याला जाणारी आणि पुण्यावरून मुंबईत येणारी वाहने वाशी, कोपरखैरणे, शिळफाटा, तळोजा या रस्त्याचा वापर करतील. नेरूळ, सिबीडी, खारघर या भागातील रस्ते बंद करण्यात येणार आहेत.























