Aryan Khal Bail : आर्यन खानच्या बेलचं काय होणार? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचं विश्लेषण
Aryan Khan Cruise Drug Case : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा अर्ज काल सत्र न्यायालयाकडून फेटाळला गेला. त्यानंतर आज आर्यनची भेट घेण्यासाठी शाहरुख खान स्वत: आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. शाहरुखनं जवळपास वीस मिनिटं आर्यनशी संवाद केला. कालही जामीन अर्ज फेटाळल्यानं क्रूज ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये राहावं लागणार आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज काल मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले आहेत. काल न्यायालयात कोणताही युक्तिवाद झाला नाही. या प्रकरणी दोन्ही पक्षांच्या वकिलांनी यापूर्वीच पूर्ण केले होते. सुनावणी पूर्ण झाल्यावर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. न्यायाधीशांनी कोर्टात आल्यावर थेट निर्णय जाहीर केला होता.























