एक्स्प्लोर
Vinayak Mete Accident Details : ट्रक चालकाने लेन बदलल्याने अपघात, अपघातातील सर्वात मोठी अपडेट
Vinayak Mete Accident News : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.
मुंबई
Mumbai Local Crimeलोकलमधून उतरताना धक्का लागल्याच्या रागातून रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्राध्यापकाची हत्या
Bhiwandi Banner News : भिवंडीत वेगळ्या समीकरणाची नांदी? सेनेच्या बॅनरवर शरद पवारांच्या खासदाराचा फोटो
मोठी बातमी: मालाड रेल्वे स्थानकात पोटात चाकू भोसकून प्राध्यापकाला संपवणारा ओंकार शिंदे सापडला
Ishwar Tayade On Sarita Mhaske : सरिता म्हस्के लक्ष्मी दर्शनासाठी २ दिवस गायब होत्या, तायडेंची टीका
Madhuri Misal On Mayor Reservation : ठाकरे गटाचा आक्षेप नियमाला धरुन नाही, मिसाळ यांची प्रतिक्रिया
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
गडचिरोली
मुंबई























