Ghatkopar Kabrastan : घाटकोपरमध्ये मनोरंजन मैदानात कब्रस्तान बनवण्याचा महापालिकेचा निर्णय
Ghatkopar Kabrastan : घाटकोपरमध्ये मनोरंजन मैदानात कब्रस्तान बनवण्याचा महापालिकेचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या मनोरंजन मैदानात पालिकेने कब्रस्थान बनविण्याचा विरोधात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.या उद्यानात पालिकेने दहा हजार पेक्षा जास्त झाडे लावलेली असताना त्याची कत्तल करुन हे इथे एकमेव असलेले मैदान तोडू नये अशी मागणी नागरिक करीत आहेत.घाटकोपर च्या वाधवा कॉम्प्लेक्स च्या बाजूला पालिकेचे मनोरंजन उद्यान आहे.त्याच्या बाजूला आधीच एक कब्रस्थान आहे.इथे जागा कमी पडत असल्याचे सांगत पालिकेकडे याचे विस्तारीकरण करण्याची मागणी केली आहे.या बाबत पालिकेने आता नागरिकांची हरकत ना हरकत मागिविल्या आहेत.यात इथल्या नागरिकांनी हजारो हरकत पत्र पाठविली आहेत.इथे हजारो झाडे उभी आहेत.दहा हजार पेक्षा जास्त नागरिक , जेष्ठ नागरिक, मुले, तरुण या मनोरंजन मैदानाचा वापर करीत आहेत.मात्र मनोरंजन मैदान चा भाग कब्रस्थान ला देऊन इथली झाडे छाटली जाणार असल्याने पर्यावरणाची ही मोठी हानी होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.यामुळे पालिकेने तत्काळ हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे.इथल्या नागरिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी…