Badlapur गुडघाभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा,बदलापूरच्या बेलवली सबवेत पाणीच पाणी, मृत्यूनंतरही परवड
बदलापूर शहरातील बेलवली भगाता असलेल्या रेल्वेच्या सबवेत पावसाळ्यात पाणी साचते, मात्र पूर्व भागात असलेल्या स्मशानभूमीत जाण्यासाठी पश्चिम बाजूस राहणाऱ्या नागरिकांना कुठलाही दुसरा रस्ता नाही, त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांना सबवेत साचलेल्या गुडघाभर पाण्यातून अंत यात्रा काढावी लागली, आज तेव्हा काकांचं निधन झाल्यावर त्यांना गुडघ्याभर पाण्यातून अंत्ययात्रा न्यावी लागली त्यामुळे व्यथित झालेल्या मृत व्यक्तीच्या पुतण्याने फेसबुकवर पोस्ट टाकत आपली व्यथा मांडली. दर वर्षी पावसाळ्यात बेलवली सबवेमध्ये पाणी साचत असूनही स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करते त्यामुळे बदलापुरात मृत्यूनंतरही हेळसांड थांबत नसल्याचं समोर आले आहे.























