एक्स्प्लोर

Environment day : 'बॉटल्स फॉर चेंज'... मुंबईत Bisleri चा देशातील पहिला पर्यटनस्नेही प्लास्टिक विघटन प्रकल्प

प्लास्टिकवर बंदी आणून भागणार नाही हे एव्हाना आपल्याला कळून चुकलंय. कारण आज प्लास्टिक हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलंय. मात्र हे प्लास्टिक पर्यावरणासाठी मात्र घातकच. त्याच योग्य आणि शास्त्रोक्त पद्धतीनं विघटन होणं जितकं आवश्यक आहे, तितकचं त्याचं विलगीकरणही आवश्यक आहे. 'बिस्लेरी' या नावाजलेल्या कंपनीनं मुंबईत देशातील पहिला पर्यटनस्नेही प्लास्टिक विघटन करणारा प्रकल्प उभारला आहे.

'बॉटल्स फॉर चेंज' या संकल्पनेखाली अंधेरी मरोळ इथं मुंबई महापालिकेच्या मदतीनं बिस्लेरीनं हा अनोख प्रकल्प उभा केलाय. याचं सर्वात मोठ वैशिष्ठ्य म्हणजे इतर प्रकल्पांप्रमाणे इथं तुम्हाला दुर्गंधी, अस्वच्छता कुठेही दिसणार नाही. इथल्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉक, केबिनचे दरवाजे, फ्लोरिंग टाईल्स, इतकंच काय तर भिंतीही रिसायकल केलेल्या प्लास्टिक शिट्सपासून बनवण्यात आल्यात. या शिट्स इतक्या मजबूत आहेत की नुकत्याच झालेल्या 'तौक्ते' चक्रीवादळात त्या जागच्या जराही हलल्या नाहीत.
 
सर्वात महत्वाचं म्हणजे 'बॉटल फॉर चेंज' या नावानं बिस्लेरीनं एक मोबाईल अैपही तयार केलंय. ज्यात रजिस्टर करून मुंबईतल्या कुठल्याही कोप-यातून तुम्ही या उपक्रमचा भाग होऊ शकता. एका क्लीकवर तुमचा प्लास्टिक कचरा तुम्ही इथवर पोहचवू शकता. याकामात रस्त्यांवर कचरा वेचणा-यांसाठी कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थाही बिस्लेरीला मदत करतात. महिन्याला 25 ते 30 टन प्लास्टिक कचरा विगलीकरण करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. भविष्यात या प्रकल्पाची व्याप्ती वाढवून असे प्रकल्प अन्य शहरांतही उघडण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
 
लोकांकडनं गोळा केलेला कचरा इथं आणल्यावर कन्व्हेअर बेल्टवर तो वेगळा केला जातो, त्यानंतर कंप्रेसरमध्ये प्रचंड दाबाचा वापर करून त्याचे 150 किलोचे 'बेल' (गठ्ठे) तयार केले जातात. हे बेल मग प्लास्टिक रिसायकल करणा-या कंपन्याना पुरवले जातात. मग त्याच्या सहाय्यानं गार्डनमधील बेंच, झांडाभेवतीची सुरक्षा जाळी, पेव्हर ब्लॉक, टाईल्ट, शिट्स इतकचं काय तर कपडेही बनवले जातात. बिस्लेरीनं तर आपल्या कर्मचा-यांसाठी याच प्लास्टिकपासून तयार केलेले युनिफॉर्मही बनवून घेतलेत हे विशेष. तेव्हा 'बॉटल फॉर चेंज' च्या माध्यमातून बिस्लेरीनं सुरू केलेल्या या उपक्रमाचं कौतुक करावं तितकं थोडचंय.
 
मुंबई व्हिडीओ

Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांच्या 'त्या' वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल
Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांच्या 'त्या' वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निलेश लंकेंसाठी शरद पवारांची सभा; कार्यकर्त्यांच्या बैठकीत 'हिटलर'ची पत्रकं, साधर्म्याचे 23 मुद्दे
निलेश लंकेंसाठी शरद पवारांची सभा; कार्यकर्त्यांच्या बैठकीत 'हिटलर'ची पत्रकं, साधर्म्याचे 23 मुद्दे
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर
100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर
Sangli Loksabha : संजय राऊत म्हणाले, जयंत पाटलांना सांगलीची जास्त माहिती; जयंत पाटील म्हणतात, 'सर्वांचा रोख माझ्यावर, पण माझा...'
राऊत म्हणाले, जयंत पाटलांना सांगलीची जास्त माहिती; जयंतराव म्हणतात, सर्वांचा रोख माझ्यावर, पण..
Advertisement
Advertisement
for smartphones
and tablets
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal On Nashik Loksabha : नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार ABP MajhaChandrapur Voter Name Issue : चंद्रपुरमध्ये मतदार यादीत मतदारांची नावंच सापडेना ?Mahesh Kharade : महेश खराडे यांनी घोड्यावर स्वार होत भरला उमेदवारी अर्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निलेश लंकेंसाठी शरद पवारांची सभा; कार्यकर्त्यांच्या बैठकीत 'हिटलर'ची पत्रकं, साधर्म्याचे 23 मुद्दे
निलेश लंकेंसाठी शरद पवारांची सभा; कार्यकर्त्यांच्या बैठकीत 'हिटलर'ची पत्रकं, साधर्म्याचे 23 मुद्दे
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर
100 टक्के फिट नसतानाही IPL खेळतोय, सूर्याचं फिटनेस अपडेट समोर
Sangli Loksabha : संजय राऊत म्हणाले, जयंत पाटलांना सांगलीची जास्त माहिती; जयंत पाटील म्हणतात, 'सर्वांचा रोख माझ्यावर, पण माझा...'
राऊत म्हणाले, जयंत पाटलांना सांगलीची जास्त माहिती; जयंतराव म्हणतात, सर्वांचा रोख माझ्यावर, पण..
Hemant Godse on Chhagan Bhujbal : भुजबळांच्या माघारीनंतर खासदार हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, नाशिकच्या जागेवर...
भुजबळांच्या माघारीनंतर खासदार हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, नाशिकच्या जागेवर...
VIDEO : हिटमॅन रोहित शर्मानं मुंबईचं नेतृत्व संभाळलं, अखेरच्या षटकात हार्दिक फक्त पाहातच राहिला
VIDEO : हिटमॅन रोहित शर्मानं मुंबईचं नेतृत्व संभाळलं, अखेरच्या षटकात हार्दिक फक्त पाहातच राहिला
VIDEO: भाषण सुरू असतानाच शरद पवारांकडे अज्ञात वस्तू फेकली; बॉडीगार्डने हातोहात झेलली!
Video: भाषण सुरू असताना शरद पवारांकडे फेकली वस्तू; बॉडीगार्डने हातोहात घेतला कॅच
Chhagan Bhujbal On Nashik Loksabha : नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार ABP Majha
Chhagan Bhujbal On Nashik Loksabha : नाशिक लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांची माघार ABP Majha
Embed widget