Dahi Handi 2021 : दहिहंडीवरुन MNS, BJP विरुद्ध ठाकरे सरकार संघर्ष पेटणार? ABP Majha
केंद्राने राज्याला रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केल्यानंतर राज्यात अधिक काळजीची गरज असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. केरळमधील ओनम सणाच्या काळात झालेल्या कोरोना प्रादुर्भाव पाहता केंद्राच्या सुचनेची अंमलबाजावणी होईल, मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालना येथे माध्यमांशी बोलताना दिली.
असं असलं तरी केंद्र सरकारच्या सूचनांचा महाराष्ट्र भाजपला विसर पडला कि काय असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. सण-उत्सवातली गर्दी टाळण्याच्या केंद्र सरकारने सूचना केल्या आहेत. तरी देखील भाजप अन् मनसे दहिहंडी साजरी करण्यावर ठाम असल्याचं चित्र दिसून येत आहे. तर ठाण्यात मनसेची दहीहंडी उत्सवाची तयारी देखील सुरु झाली आहे. तर दहीहंडी उत्सवाच्या आयोजनावरुन मनसे पदाधिकारी, गोविंदा पथकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.