Aaditya Thackeray : पहाटे चार वाजता आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल, प्रकरण नेमकं काय?
डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह सचिन अहिर आणि सुनिल शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. लोअर परेल पुलाचं बेकायदेशीररित्या उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हाी दाखल करण्यात आलाय.. एन एम जोशी पोलीस स्टेशन येथे मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आालाय..
गुरूवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीररित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डीलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले होते. या विरोधात आता मुंबई महापालिका अॅक्शन मोड मध्ये आलेली पाहायला मिळतेय.























