Balasaheb Thackeray Smrutidin : उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाचे नेते आज स्मृतीस्थळावर दर्शन घेणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतीदिन. आज ठाकरे गटाचे आमदार, खासदार, नेते आणि शिवसैनिक दादर इथं बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन वंदन करणार आहेत. शिवसेनेतील सर्वात मोठ्या फुटीनंतर स्मृतिस्थळावर संघर्ष टाळण्याचा प्रयत्न शिंदे गटानं केला. मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला कालच स्मृतिस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. तर शिंदे समर्थक तिथून जाताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झाले आणि त्यांनी स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण केलं.... आज ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं येणार असल्यानं तिथं खास व्यवस्था करण्यात आलीय.























