![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Avinash Jadhav on Toll Free Entry Mumbai : आम्ही लाठ्या खाल्ल्या पण टोलमाफी झाली; आनंदाचा दिवस
Avinash Jadhav on Toll Free Entry Mumbai : आम्ही लाठ्या खाल्ल्या पण टोलमाफी झाली; आनंदाचा दिवस
विधानसभेची (Vidhan Sabha Election) आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. मंत्रालयात हालचाली गतीमान झाल्या असून आज महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्य मंत्रिमंडळात मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोणत्या पाच टोलनाक्यावर टोलमाफी? आनंदनगर टोलनाका दहिसर टोलनाका मुलुंड-एलबीएस टोलनाका वाशी टोलनाका ऐरोली टोलनाका टोलमाफीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया गेली अनेक वर्ष आमचा हा लढा सुरु होता त्याला यश मिळालं आहे, उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी मिळाली. हा निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता कायम असावा नाहीतर निवडणुकीनंतर त्याचा बोजा जनतेवर माराल. मंत्रिमंडळ बैठकीच्या संदर्भात मोठी गोपनीयता महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीच्या संदर्भात मोठी गोपनीयता ठेवण्यात आली आहे. मंत्रीमंडळ बैठकीचा अजेंडा मंत्र्यांना थेट बैठकीत दिला जाणार आहे. बैठकीच्या आधी कोणत्याही मंत्र्यांना किंवा अधिका-यांना अजेंडा दिला गेला नाही . त्यामुळे आयत्यावेळी अनेक निर्णय होणार आहे.
![Dadar Hanuman Mandir : मोठी बातमी! दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/14/b76faa8e355d81b3ebc726a607c2100f1734168654548718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Allu Arjun Arrested Full Video : Pushpa 2 चा हिरोअल्लू अर्जुनला अटक , हैदराबाद पोलिसांची कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/13/a4f01ad37b953363207def96dadf62d21734076070653718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut PC : One Nation One Election ते शरद पवार- अजित पवार भेट, राऊतांची सविस्तर प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/13/aaa10daf44e9be323013d4b04b8e878a1734070000000718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा निर्धार, मुंबई पालिका जिंकण्याचे आदेश; बीएमससीसाठी एल्गार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/13/60c50cedef9ea5a08034c4c2c79ec3371734069579135718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![NCP Sharad Pawar:राष्ट्रवादी शरद पवार पक्षात कोणतेही मतप्रवाह नाही, Mahebub Shaikh यांची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/13/9ea61609d0ccf0789c7120a171b3e7241734067123949718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)