(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anurag Kashyap | दिग्दर्शक अनुराग कश्यप वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये दाखल
मुंबई : अभिनेत्री पायल घोषच्या तक्रारीवर मुंबई पोलिसांनी अनुराग कश्यप यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे.आज सकाळी 10 वाजता वर्सोवा पोलीस स्थानकांत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अनुराग कश्यप पोलिसांसमोर हजर झाले.
पायल घोषनं नुकतीत रामदास आठवले यांच्यासोबत राजभवन गाठत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. सुरूवातीला मुंबई पोलीस काही वर्ष जुनं असलेल्या याप्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली होती. मात्र त्यानंतर वकिलांची मदत घेऊन पायलनं याप्रकरणी तक्रार देताच वर्सोवा पोलीस स्थानकांत अनुराग कश्यपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यात मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम 376 (a), 354, 341,342 अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. साल 2014 मध्ये अनुराग कश्यप यांच्यासोबत झालेल्या एका भेटीत त्यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप पायल घोषनं केला आहे.