(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 07 PM : 17 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महायुतीच्या सभेसाठी पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल, थोड्याच वेळात शिवाजी पार्कवर मोदींची तोफ धडाडणार
शिवाजी पार्कवरच्या सभेआधी मोदी चैत्यभूमी आणि सावरकर स्मारकावर जाणार, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला मोदी वंदन करणार
महायुतीच्या सभेआधी राज ठाकरेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस दाखल... सभेआधी तिन्ही नेत्यांमध्ये खलबतं...
अजित पवार महायुतीच्या व्यासपीठावर दाखल..शिंदे, फडणवीसांसह शीवतीर्थावर न जाता थेट सभेच्या ठिकाणी...
बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीच्या सभेला सुरुवात, शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगेंसह अरविंद केजरीवालही उपस्थित
देश वाचवण्यासाठी २१ दिवस बाहेर आलोय, बीकेसीतल्या सभेतून केजरीवालांचा मोदींवर निशाणा, केजरीवालांकडून मोदींची रशियाच्या पुतीनशी तुलना
केजरीवाल मुंबईत सभेसाठी दाखल झाले असतानाच ईडीचा दणका, मद्यघोटाळ्यात ईडीचं पुरवणी आरोपपत्र दाखल, केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचं आरोपी म्हणून नाव
सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य ,पण अजित पवार दोषी नाहीत, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, फडणवीसांची स्पष्टोक्ती
भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक, नाशिकमधील भेटीनंतर गिरीश महाजनांचं वक्तव्य, तर महायुतीत येण्यासाठी अनेक जण रांगेत, भुजबळांचा जयंत पाटलांना टोला
रायबरेली मतदारसंघातल्या सभेत गांधी घराण्याची भावनिक एकजूट, आलिंगन देत राहुल गांधींनी केलं आई सोनिया गांधींचं स्वागत...
भावेश भिंडेला २६ मेपर्यंत पोलीस कोठडी, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक
बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर, येस बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयकडून २०२२ मध्ये झाली होती अटक.
बीडमध्ये लाचखोर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडेंच्या घरातून १ कोटींची रोकड जप्त, चांदीच्या विटा, ताट-तांब्या आणि सोन्याची बिस्किटांचा समावेश, हरिभाऊ खाडे पसार