Abhishek Ghosalkar Firing Dahisar : अभिषेक घोसाळकरांच्या पार्थिवाजवळ बायकोने फोडला हंबरडा
बातमी अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची... मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.मॉरिस नोरोन्हा नावाच्या स्थानिक गुंडाने हा गोळीबार केला, आणि त्यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय... थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडतील... ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी घोसाळकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली...दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी मॉरिसचा पीए मेहुल पारीख आणि रोहित साहू आणि मॉरिसचा अंगरक्षकाला ताब्यात घेतलंय.. घोसाळकर आणि नोरोन्हा काल संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. लाईव्ह संपत आलं तेव्हा मॉरिस खोलीतून बाहेर गेला, पिस्तुल काढलं, आणि पुन्हा खोलीत शिरुन घोसाळकरांवर गोळीबार केला. अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
