विक्रोळीत फुटपाथच्या कामात 12 कोटींचा भ्रष्टाचार; राष्ट्रवादीचं आंदोलन
विक्रोळी पार्कसाईट येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरच्या फुटपाथच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला. सध्या मुंबई महापालिकेकडून ठिकठिकाणी रस्ते आणि फुटपाथ दुरुस्तीची कामं सुरू आहेत. विक्रोळी पार्कसाईट येथील सावरकर मार्गावर तब्बल 12 कोटी रुपये खर्च करून फक्त दीड किलोमीटर लांबीच्या फुटपाथची दुरुस्ती करण्यात येत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं त्याविरोधात उपहासात्मक आंदोलन केलं. आंदोलकांनी फुटपाथवर फुलं टाकून नागरिकांना भारतातील सर्वात महागड्या फुटपाथवर चालण्याचा अनुभव घ्या आणि त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करा अशी मागणी केली.























